सरकारी व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासाकरिता लसीकरणातून दिलेली सूट रद्द !

मुंबई: कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवास करण्यास सरकारी तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लसी चे दोन्ही डोस झाले नसले तरी प्रवासाची देण्यात आलेली परवानगी राज्य सरकार ने रद्द केली आहे. राज्य सरकारच्या आपत्ती निवारण खात्यातर्फे जारी करण्यात आलेल्या परिपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.
टाळेबंदी अंशतः उठवल्यानंतर रेल्वे ची लोकल सेवा सुरु करण्यात आली होती. सुरवातीला केवळ अत्यावश्यक सेवेतील व शासकीय कर्मचाऱ्यांकरिताच सुरु असलेली लोकल प्रवासाची सुविधा कोरोना ची दुसरी लाट ओसरतांच सर्वसामान्य प्रवाशांना देखील खुली करण्यात आली. मात्र लोकल प्रवास करण्यासाठी सर्वसामान्य प्रवाशांना लसी चे दोन्ही डोस घेऊन १४ दिवस झाल्यानंतरच रेल्वे प्रवासासाठी मासिक पास देण्याची अट घालण्यात आली होती. या अटीमधून राज्य तसेच केंद्र सरकारी कर्मचारी व अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करण्यात आलेल्या प्रवाशांचा अपवाद करण्यात आला होता. मात्र आज रोजी जारी करण्यात आलेल्या पत्रकात सदर परवानगी रद्द करून केवळ दोन्ही डोस घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण झालेल्या सर्व व्यक्तीची गणना ‘वॅक्सीनेटेड’ गटात करण्यात येत असून केवळ अशाच प्रवाशांना रेल्वे प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.
लसीकरणाचा वेग आता वाढला असून असून सरकारी व खासगी लसीकरण केंद्रांवर मुबलक प्रमाणात लस उपलब्ध झाल्याने तसेच लसीकरण सुरु होऊन बराच कालावधी लोटला असल्याने लस मिळत नाही हे कारण वरील संवर्गातील कर्मचारी आता करू शकणार नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले आहे
शासकीय आदेश-
Vaccinated persons GOM order 26 Oct 2021