हेल्मेट नाही घातले, सीट बेल्ट नाही लावला तर आता होणार ‘इतका’ जबरदस्त दंड !
नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना सुधारीत मोटर वाहन अधिनियम कायदा होणार लागू..

मुंबई : राज्यातील वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन न केल्यास आता जबरदस्त दंड भरावा लागणार आहे.वाहतुकीच्या संदर्भातील नवे नियम पुढील आठवड्यापासून लागू होणार असल्याची शक्यता आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटर वाहन अधिनियम कायदा 2019 अंतर्गत सोमवारपासून कारवाई करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. नव्या नियमांनुसार, मध्यपान करुन वाहन चालवणाऱ्यांवर, न्यायालयीन कारवाईनंतर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नवीन मोटर वाहन कायद्यानुसार, पहिल्या गुन्ह्यासाठी 6 महिने तुरुंगवास आणि / किंवा 10,000 रुपये दंड ठोठावला जाण्याची तरतूद आहे.
तर दुसऱ्यांदा याच गुन्ह्यासाठी कमाल 2 वर्षे तुरुंगवास आणि / किंवा 15,000 रुपयांचा दंड आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले, आम्ही काही नियमांच्या दंडात कपात करण्याचा निर्णय घेणार आहोत. फॅन्सी नंबर प्लेट असल्यास वाहनचालकांनाही 1 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास आकारण्यात येणाऱ्या सुधारित दंडाची अंमलबजावणीचा निर्णय वाहनचाकांना शिस्त लागावी तसेच अपघात कमी करण्यासाठी लागू करण्यात येणार आहे. सूत्रांनी सांगितल्यानुसार फॅन्सी नंबर प्लेटसाठी, रिफ्लेक्टर, टेल लॅम्प नसल्यास, हेल्मेट नसल्यास तसेच सीटबेल्ट नसल्यास वाहन चालकांना 1000 रुपये दंड तर वेगाने बाईक चालविल्यास, परमिटशिवाय वाहन चालविल्यास2000 रुपये दंड आकारला जाऊ शकतो