
मुंबई: राज्य सरकारनं लोकलनं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी दिलासादायक पाऊल उचलले आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊन १४ दिवस झालेली प्रत्येक व्यक्ती आता रेल्वे पास ऐवजी दैनंदिन तिकीट काढून प्रवास करू शकणार आहे.
पूर्ण लसीकरण होऊन १४ दिवस लोटलेल्या व्यक्तींना एक दिवसासाठी लोकल प्रवासाचं तिकीट द्यावं,असं पत्र राज्य सरकारनं रेल्वे प्रशासनानाला पत्र दिले आहे.
मुंबईकरांसाठी ही मोठी बातमी आहे. गेल्या तीन चार दिवसांपूर्वी रेल्वे प्रवाशांसाटी सिझन तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यांना रोजच्या प्रवासासाठी तिकीट न देण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला होता.त्यामुळे रेल्वे स्टेशनवर वाद होत होते. आता राज्य सरकारनं अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना किंवा इतरांनाही एका दिवसाच्या प्रवासाचं तिकीट देण्यात यावं यासाठी पत्र लिहिलं आहे. याशिवाय कोरोना लस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्तींना लोकल प्रवासाचं तिकीट द्यावं. रेल्वे प्रशासनानं यासंदर्भातील खात्री करावी आणि नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असं पत्र राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानं रेल्वेला दिलं आहे.