आम्ही आहोत म्हणून सत्ता आहे,अशोक चव्हाणांच्या वक्तव्याने खळबळ

मुंबई:- महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये सातत्याने खटके उडत असतात.अनेकदा हे खटके चव्हाट्यावर देखील येतात.अश्यातच नुकतंच एका सभेत बोलताना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी ‘आम्ही आहोत म्हणून सत्ता आहे’ असं वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. मंत्री अशोक चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना मोठ्या प्रमाणात उधाण आलं आहे.
काही महिन्यांपूर्वी नाना पटोले आणि शिवसेना प्रवक्ते खा.संजय राऊत यांच्यामध्ये सुद्धा मोठा वादंग रंगला होता.यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रहारचे पक्षाचे अध्यक्ष तसंच राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यात देखील वाद झाल्याचं पाहायला मिळालं होतं.अश्यातच आता पुन्हा एकदा अशोक चव्हाणांनी केलेल्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील खदखद समोर आली आहे.
यासर्वांवर दरम्यानच्या काळात मुख्यमंत्र्यांनी देखील माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया देत,’महाविकास आघाडीत मतभेद असतील पण मनभेद नाहीत,त्यामुळे अंतर्गत वाद वैगरे काही नाही,सामाजिक कामं करत असताना कधी कधी खटके उडत असतात’,अशी प्रतिक्रिया दिली होती.