बाळाला चुकूनही ‘या’ गोष्टी खायला देऊ नका, नाहीतर होतील गंभीर परिणाम !!

चिमुकल्या बाळाचे घरात आगमन झाले, की पालकांना आकाश ठेंगणे होते. आपल्या काळजाच्या तुकड्यासाठी काय काय करु, असे होऊन जाते.बाळाचे कोडकौतुक करण्यात सारेच हरवून जातात.
बाळ कधी एकदा खायला सुरुवात करतेय, असे होते, पण खरंतर एक वर्षापर्यंत बाळाची पचनसंस्था पूर्ण विकसित झालेली नसते. त्यामुळे तोपर्यंत त्यांना फक्त द्रव पदार्थच खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. बाळाला काय खायला देऊ नये, याबाबत जाणून घेऊ या.
१. सायट्रिक फळे – लिंबूवर्गीय फळांमधील आम्लीय घटक बाळाला पचत नाही. त्याला पोटदुखी होऊ शकते. त्याच्या शरीरावर पुरळ येण्याची शक्यता असते.
२. मीठ – बाळाची किडनी एक वर्षापर्यत पूर्ण विकसित होत नाही. त्यामुळे त्याच्या खाण्यात मीठ वापरु नका. बाळाला दिवसभरात एक ग्रॅमपेक्षा कमी मीठ पुरेसे असते. ते त्याला आईच्या दुधातूनही मिळते.
३. साखर – अनेक केमिकल वापरुन साखर तयार होते. त्यामुळे बाळाच्या आरोग्यासाठी साखर हानीकारक आहे. त्याची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते.
४. द्राक्षे – बाळाला कधीही द्राक्षे खाण्यास देऊ नयेत. ते घशात अडकून गुदमरू शकते. द्राक्षे आंबट असल्याने मुलास पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.
५. अंडी – बाळ एक वर्षाचे झाल्यानंतरच अंडी खायला द्या. सुरुवातीला त्याला फक्त अंड्याचा पिवळा बलक कमी प्रमाणात खाण्यास द्या. अंड्याच्या पांढऱ्या भागाची अॅलर्जी होऊ शकते.
बाळाला कोणतीही गोष्ट खायला देण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या