कणकवलीत शिवसैनिकावर जीवघेणा हल्ला,सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वातावरण तापले

सिंधुदुर्ग- शिवसेनेचे नेते व सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक तसंच करंजे गावचे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. अज्ञात इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी टोकदार चाकूने वार केल्याने परब जखमी झाले आहेत.जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेने सिंधुदुर्ग जिल्हा हादरला आहे.
या घटनेनंतर आता राजकिय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येवू लागल्या आहेत. पराभवाच्या भीतीने असा हल्ला केल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप केला आहे. या दहशतीला शिवसेना चोख उत्तर देईल, असा इशारा शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.
या घटनेची सर्व जबाबदारी आमदार नितेश राणे आणि त्यांचे सहकारी गोट्या सावंत यांच्यावर टाकून त्यांनी लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी संतोष परब यांनी केली आहे.या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीसांनी सर्तक होत आरोपींचा शोध सुरू केला आहे.तसंच लवकरात लवकर आरोपींना शोधून काढू असं आश्वासन स्थानिक पोलिसांनी दिले आहे.