भाजप ही महाराष्ट्रातील चोरों का बाजार आहे. तर किरीट सोमय्या या बाजारातील बाराती आहेत,या नेत्याचा घणाघात

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून आघाडीच्या अनेक मंत्र्यांची केंद्रीय तपास यंत्रणेने चौकशी केली होती. तसेच अनेकांच्या घरी धाडी सुद्धा टाकल्या होत्या. त्यातच भाजपा नेते ज्यांच्यावर टीका आणि आरोप करतायत त्यांच्या मागे काही दिवसातच केंद्रीय तपास यंत्रणेच्या चौकशीच्या फेऱ्या सुरु झालेल्या दिसून येत आहे. अशातच प्रस्तवराडीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपा नेत्यावर टीका केली आहे.
मलिक म्हणाले की, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे तपास यंत्रणांना माझ्याविरोधात सूचना देत आहेत. त्यामुळे त्यांनी आता स्वत: तपास यंत्रणांचा ओएसडी बनावं आणि किरीट सोमय्या यांना या यंत्रणांचा प्रवक्ता बनवावं, असा टोला राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी लगावला आहे. मागच्या काही दिवसांपासून मलिक यांनी भाजपा नेत्यावर अनेक गंभीर आरोप लगावले होते. त्यातच आता ईडीच्या चौकशीवर फडणवीस आणि सोमय्या यांना टोला लगावला आहे.
नवाब मलिक बीडमध्ये आहेत. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी थेट देवेंद्र फडणवीसांवरच हल्ला चढवला. फडणवीस तपास यंत्रणांना माझ्याविरोधात सूचना देत आहेत. मी काही कुणालाही घाबरणार नाही. भाजप ही महाराष्ट्रातील चोरों का बाजार आहे. तर किरीट सोमय्या या बाजारातील बाराती आहेत, असा घणाघाती हल्ला मलिक यांनी चढवला.