बिग बॉस मध्ये बिचुकलेचा धुमाकूळ! देवोलिना कडे मागितली ‘किस’
देवोलिना ची आई संतापली, म्हणाली हा फालतू माणूस..

टीआरपी वाढवण्यासाठी ‘बिग बॉस १५’च्या घरात अनेक स्पर्धकांना वाईल्ड कार्ड एन्ट्री देण्यात आली. मात्र हे स्पर्धक घरात आलेत आणि घरातले राडे आणखीच वाढले. गेल्या आठवड्यात तर ‘बिग बॉस १५’च्या घरात अभिजीत बिचुकलेने नुसता धुमाकूळ घातला. एका टास्कदरम्यान त्याने चक्क देवोलिना भट्टाचार्जीहिच्याकडे किसची मागणी केली.
तसेच बिचुकले याने मर्यादा ओलांडून त्याने देवोलिनाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्नही केला. यानंतर घरातलं वातावरण चांगलंच तापलं होतं. आता या मुद्दयावरून घराबाहेरचं वातावरणही तापलं आहे. होय, आता देवोलिनाच्या आईने यावर प्रतिक्रिया दिली आहे. लेकीला किस मागणा-या बिचुकलेवर देवोलिनाची आई चांगलीच संतापली आहे.
टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, देवोलिनाच्या आईने बिचुकलेला चांगलंच फटकारलं. बिचुकले हा फालतु माणूस आहे. मी सगळं टीव्हीवर पाहिलं तेव्हा मला प्रचंड राग आला होता. आधी बिचुकले मस्करी करतोय, असं मला वाटलं होतं. पण त्याने पुन्हा पुन्हा किसची मागणी केली. देवोलिनाने यावर लगेच रिअॅक्ट व्हायला हवं होतं, असं सलमान म्हणाला.
पण माझ्यामते, देवोलिनाला देखील तो मस्करी करतोय, असंच वाटलं असावं. पण तो मस्करीत बोलत नाहीये, हे कळल्यावर तिने त्याला जोरदार उत्तर दिलं. बिचुकले शोमध्ये आला तेव्हापासूनच तो मला जराही आवडला नव्हता. त्यानं जे काही केलं, त्याचं मुळीच समर्थन करता येणार नाही, अशा शब्दांत देवोलिनाच्या आईने तिचा संताप व्यक्त केला.