खासदार उदयनराजेंनी पुन्हा एकदा आपली कॉलर उडवत कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका

सातारा – नेहमीच आपल्या हटके स्टाइलसाठी आणि विधानासाठी प्रसिद्ध असणारे साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पुन्हा एकदा आपल्या कार्यकर्त्यांची मनं जिंकली. कार्यकर्त्यांनी उदयनराजेंवरील गाण्यावर बेफाम डान्स सुरू केला मग काय उदयनराजेंनीही कॉलर उडवून ठेका धरला. साताऱ्यात आज उदयनराजे भोसले यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
दस्तगीर कॉलनीमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. उदयनराजे आले आणि चाहत्यांच्या उत्साहाचा पारवारा उरला नाही. उदयनराजेंचा सत्कार झाला. त्यानंतर उदयनराजे यांच्यावर लिहिलेले ‘नाद नाही राजेंचा करायचा’ हे गाणं लावलं. मग काय कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष करत बेफाम डान्स केला. यावेळी कार्यकर्त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना आग्रह केला.
मग काय उदयनराजेंनीही कॉलर उडवून ठेका धरला. उदयनराजेंनी ठेका धरलेला पाहून कार्यकर्त्यांचा आनंदाचा पारवारा उरला नाही. उदयनराजेंच्या नावाने घोषणा देत कार्यकर्ते तुफान नाचले. हा व्हिडीओ साताऱ्यात चांगलाच व्हायरल झाला आहे.