क्राइम
अनैतिक संबंधांमध्ये मुलगा अडचण ठरतोय म्हणून जन्मदात्या आईनेच केली ३ वर्षीय मुलाची हत्या,घटनेनं पोलीसही गहिवरले

सांगली:- सांगलीमधून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे.अनैतिक संबंधांमध्ये ३ वर्षीय मुलगा अडचण ठरत असल्याने जन्मदात्या आईनेच आपल्या पोटच्या मुलाची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार सांगलीतल्या वाळवा तालुक्यात घडलाय.प्राची वाझे असं या जन्मदात्या आईचं नाव आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून प्राचीचे एका प्रियकरासोबत अनैतिक संबंध होते.याच अनैतिक संबंधात ३ वर्षीय चिमुरड्याची त्याच्या जन्मदात्या आईने हत्या केली आहे.या घटनेनं संपूर्ण वाळवा तालुका हादरला असून प्राचीला कठोरतील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी स्थानिक करताना पाहायला मिळत आहेत.
दरम्यान,प्राचीचा प्रियकर पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.संबंधित घटनेचा तपास सांगली पोलीस करत असून लवकरात लवकर दोषींना कठोर शिक्षा होईल,असे आश्वासन वाळवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिले आहे.