महाराष्ट्र

एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या गाडीवर हल्ला,शेतात पळाल्याने बचावल्या

जळगाव- राजकिय वर्तुळातून एक गंभीर बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या गाडीवर काल रात्री प्राणघातक हल्ला झाला. यावेळी काही अज्ञात व्यक्तींनी रोहिणी खडसे यांच्या गाडीवर दगडफेक केली. हे सर्व सुरू असताना अचानक मोठ्या दगडाने त्यांच्या गाडीच्या काचेवर प्रहार करण्यात आला. या हल्ल्याने परिसरातील वातावरण तणावाचं बनलं आहे.

रोहिणी खडसे या काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मानेगाववरून मुक्ताईनगरकडे येत असताना त्यांच्या कारवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. माहितीनुसार, घटनेदरम्यान रोहिणी खडसे बचावासाठी शेतात पळाल्याने त्या सुखरूप बचावल्या आहेत.

रोहिणी खडसे मुक्ताईनगरकडे येत असताना हा हल्ला करण्यात आला असल्याची माहिती आहे. काल म्हणजेच २७ डिसेंबरच्या रात्री झालेल्या या हल्ल्यात त्यांच्या गाडीची तोडफोड झाली असल्याचं समजतंय. सुदैवाने रोहिणी खडसे यांना यात काहीही दुखापत झाली नाही.

रोहिणी खडसे यांच्यासह त्यांचे सहाय्यक पांडुरंग नाफडे आणि गाडीचे ड्रायव्हर असे एकूण तीन जण कारमध्ये होते. दरम्यान पाच हल्लेखोरांनी हल्ला करून घटनास्थळावरून पलायन केले. मात्र, हा हल्ला राजकीय वादातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्या हल्लेखोरांकडे लोखंडी रॉडसह शस्त्रंही होती असा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!