एसटी कर्मचाऱ्यांवरील कारवाईला वेग, ‘इतक्या’ निलंबित संपकऱ्यांना केलं बडतर्फ

मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीवर गेल्या दोन महिन्यांपासून ठाम असलेल्या कर्मचाऱ्यांना वारंवार कामावर येण्याचे आवाहन करुन देखील कर्मचारी कामावर येत नसल्याने एसटी महामंडळाने अखेर निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. महामंडळाने आणखी १७४ निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले असून आत बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या ४१५ वर पोहचली आहे.
एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या मागणीवरुन सुरु असलेला संपाचा वाद वाढत चालला आहे. दोन महिने होऊन सुद्धा एसटीचा संप सुरूच आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. एसटी कर्मचारी बेकायदेशीर संपावर गेल्यामुळे एसटी महामंडळाने कारवाई सुरु केली आहे. महामंडळाने आतापर्यत राेजंदारीवरील अडीच हजार कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली असून १० हजार ७३१ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
मात्र, निलंबनाच्या कारवाई नंतरही कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. निलंबित कामगारांना आतापर्यत मंडळाकडून दोन वेळा संधी देण्यात आलेली होती. मात्र,संधी देऊन सुद्धा निलंबित कर्मचारी कामावर हजर झाले नाही. त्यामुळे आता निलंबित कामगारांना बडतर्फीची कारणेदाखवा नोटीस महामंडळाकडून देण्यात सुरुवात केली आहे. गेल्या १५ दिवसता ६०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कारणेदाखवा नोटीस महामंडळाकडून बजवाली आहे. तर महामंडळाने १७४ निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या ४१५ वर पोहचली आहे.