महाराष्ट्र
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या बनली ठाकरे घराण्याची सून

मुंबई :- राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील या मंगळवारी (दि. २८) मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू निहार बिंदूमाधव ठाकरे यांचेशी ताज हॉटेलमध्ये विवाहबद्ध झाल्या. निहार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुतणे आहेत, तर अंकिता पाटील पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या असून नवी दिल्ली येथील इंडियन शुगर मिल असोसिएशनच्या कायदेशीर सहसमितीच्या अध्यक्षा आहेत.
या विवाहमुळे ठाकरे व पाटील घराण्याचे नवीन ऋणानुबंध निर्माण झाले आहेत.अंकिता पाटील व निहार ठाकरे हे उच्चशिक्षित आहेत. कोरोनाच्या निर्बंधांमुळे अत्यंत निवडक पाहुणे व नातेवाईकांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला.उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सौ. सुनेत्राताई अजित पवार यांनी देखील उपस्थित राहून वधुवरांना शुभ आशीर्वाद दिले.