राज्य परीक्षा परिषदेची वेबसाईट हॅक; शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची यादी सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई- राज्य परीक्षा परिषदेची वेबसाईट हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. वेबसाईट हॅक झाल्यानंतर ५ वी आणि ८वीतील शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची यादी समाजमाध्यमांत व्हायरल झाली आहे. त्यानंतर वेबसाईट हॅक झाल्याचे लक्षात आले आहे,अशी माहिती परीक्षा परिषदेकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची कोणतीही यादी अद्याप परीक्षा परिक्षेने प्रसिद्ध केलेली नाही. यादी प्रसिद्ध केल्यानंतर त्या संदर्भातील माहिती दिली जाईल,असे परीक्षा परिषदेची वेबसाईट हॅक झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितले.याबाबत सायबर शाखेकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
‘शिष्यवृत्ती परीक्षा – २०२१ चा अंतिम निकाल व गुणवत्ता याद्या अद्याप परीक्षा परिषदेकडून अधिकृतरित्या प्रसिध्द करण्यात आलेल्या नाहीत’, अशी ठळक शब्दांत सूचना वेबसाईटवर दिसत आहे.मात्र वेबसाईट हॅक झाल्यानं राज्य परीक्षा परिषद विभागात खळबळ माजली आहे.