पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करा आणि आपल्या मुलाला ५ वर्षात ‘लखपती’ करा

मुंबई – जर तुम्ही नुकतेच आई किंवा वडील झाले असाल आणि तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी चांगली आर्थिक योजना शोधत असाल, तर ही पोस्ट ऑफिस बचत योजना तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. या योजनेत मासिक २००० रुपये जमा केल्यास, तुमचे मूल ५ वर्षांचे होईपर्यंत ते लखपती होऊ शकतं.
सरकार देशभरातील पोस्ट ऑफिसमध्ये अनेक प्रकारच्या बचत योजना देते. यापैकीच एक म्हणजे ५ वर्षांची आर.डी योजना होय. यामध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करावी लागेल. योजनेत पालक मुलाच्या नावावर गुंतवणूक करू शकतात. सध्याच्या नियमांनुसार, या योजनेत ५.८% वार्षिक व्याज मिळत आहे. हे सामान्य बचत खात्याच्या व्याजापेक्षा जास्त आहे. त्याच वेळी, हे व्याज दर तिमाहीत चक्रवाढ आधारावर तुमच्या रक्कमेत जोडले जाते.
मुलाच्या वयाच्या ५ व्या वर्षी भरीव रक्कम हवी असेल आणि त्याला लखपती बनवायचे असेल तर या बचत योजनेत तुम्हाला दरमहा फक्त २००० रुपये जमा करावे लागतील. जर तुम्ही रोजच्या आधारावर बघितले तर हा खर्च ६७ रुपयांपेक्षाही कमी आहे. अशाप्रकारे, ५ वर्षांमध्ये तुम्ही या खात्यात १.२० लाख रुपये जमा कराल. तुम्हाला उर्वरित मॅच्युरिटीवर व्याजाची संबंधित रक्कम देखील मिळेल. अशाप्रकारे तुमच्या मुलाच्या नावावर मोठी रक्कम जमा केली जाईल.