महाराष्ट्रमुंबई

कुलगुरूंकडून अभिप्राय आल्यानंतर महाविद्यालये सुरू ठेवण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेणार-मंत्री उदय सामंत

मुंबई- मुंबईसह राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट निर्माण झाले असून या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी रात्री उशिरा मुंबईसह राज्यातील विद्यापीठांचे कुलगुरू, रजिस्टार, उच्च शिक्षण विभागातील अधिकारी यांची आढावा बैठक घेतली.

मुंबई, पुण्यासारख्या शहरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडत असल्याने राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालये सुरू ठेवणे कितपत योग्य राहील, यावर चर्चा करण्यात आली. तसेच या विषयावर कुलगुरूंनी येत्या काही दिवसांत अभिप्राय सादर करण्याच्या सूचनाही उदय सामंत यांनी दिल्या आहेत. कुलगुरूंकडून अभिप्राय आल्यानंतर विद्यापीठे आणि महाविद्यालये सुरू ठेवायची की नाहीत यावर धोरणात्मक निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन पद्धतीने पार पडलेल्या या बैठकीला राज्यभरातील विद्यापीठांचे कुलगुरू, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक धनराज माने, तंत्रशिक्षण संचालक अभय वाघ, अकृषी विद्यापीठांचे सर्व कुलगुरू उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!