वैद्यकीय

वयाच्या चाळीशीनंतर ‘या’ सवयी करतात आरोग्याचं नुकसान

आजकाल विशिष्ट जीवनशैलीमुळे अनेक लोक आजारांपासून त्रस्त असल्याचे आपण पाहतो. यात मधुमेह, उच्च रक्तदाब, पोटाचे विकार, हृदय रोग, किडनीचा त्रास आणि अजून बरेच मोठमोठे आजार यांचा समावेश आहे. तुम्ही कधी हा विचार केला आहे का? कि हे आजार होण्यामागील कारण काय? यामागील सर्वात मुख्य कारण म्हणजे तुमची नियमित जीवनशैली आणि आहार पद्धती. या दोन्ही गोष्टींचा आपल्या आरोग्यावर थेट परिणाम होत असतो. त्यात वाढते वय असेल तर आणखी काळजी घेणे गरजेचे असते.

अनेक लोक वाढत्या वयानुसार प्रौढ नव्हे तर लहान होऊ लागतात. त्यांना खाण्या पिण्याच्या गोष्टींपासून ते प्रत्येक लहान सहान गोष्टी करा असे सतत सांगावे लागते. पण ते काही ऐकत नाहीत. परिणामी आजारपण येते. या कॅटेगरीत समावेश होतो तो चाळीशी उलटलेल्या लोकांचा. आपण अश्या वयात असतो जेव्हा आपल्याला आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे असते आणि नेमके याच वयात आपण ना डाएटचा विचार करतो, ना व्यायाम आणि ना इतर चांगल्या सवयींचा अवलंब करतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वयाच्या चाळीशीनंतर आपल्या कोणत्या सवयी आपल्या आरोग्याचे नुकसान करतात हे सांगणार आहोत.

१.चुकीच्या पद्धतीत उठणे बसणे – वयाच्या चाळीशीनंतर आपल्या हाडांमधील पेशी कमकुवत झालेल्या असतात. त्यामुळे अचानक उठणे-अचानक बसणे या सवयी आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. यामुळे हाडांचा त्रास आणि अर्थातच पेशींचा त्रास निर्माण होतो. परिणामी मणक्याचा त्रास आपल्या आरोग्यविषयक समस्येंमध्ये वाढ करतो.

२.मद्यपान आणि धूम्रपान – मित्रांनो, मद्यपान आणि धूम्रपान या सवयी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक असतात. त्यामुळे अशा सवयींवर वेळीच पाणी सोडा. मद्यपानामुळे किडनी संबंधित आजार होऊ शकतात. तर धुम्रपान केल्यामुळे श्वसनसंस्थेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यामुळे किडनी विकार आणि हृदय विकाराचा धोका वाढतो.

३.तेलकट आणि मसालेदार खाणे – आपल्या जिभेचे चोचले प्रमाणापेक्षा जास्त पुरवणे हे कोणत्याही वयात आपल्या आरोग्यासाठी नुकसानदायीच आहे. त्यात वयाच्या चाळिशीनंतर आपली पचनसंस्था कमकुवत झालेली असते. अशावेळी तेलकट, मसालेदार आणि चमचमीत पदार्थ खाऊन तिच्यावर अत्याचार करण्याला काहीही अर्थ नाहीये. त्यामुळे सर्वात आधी आपल्या खायच्या सवयी पोषक आणि सकस आहाराकडे वळवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!