हार फुलांऐवजी वही ,पेन आणि पुस्तकांनी साजरा करा माता जिजाऊ जन्मोत्सव:राजू झनके

मुंबई:-शिक्षणाचे महत्व दिवसेंदिवस वाढत असल्याने महापुरुषांच्या जयंती तसेच सार्वजनिक कार्यक्रमात हारफुलांना फाटा देत वह्या पेन व पुस्तकाचा वापर करण्याचे आवाहन एक वही एक पेन अभियानच्या माध्यमातून करण्यात येते येत्या १२ जानेवारी रोजी येणाऱ्या माता जिजाऊ जन्मोत्सवात देखील हारफुलांचा वापर न करता वह्या पेन आणि पुस्तक अर्पण करून जिजाऊ मातेला अभिवादन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
समाजातील आर्थिक दुर्बाल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत म्हणून महापुरुषांच्या जयंतीदिनी, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापारीनिर्वाण दिनी तसेच सार्वजनिक गणेशोत्सवात हार फुलांऐवजी वही पेन पुस्तके या शैक्षणिक साहित्यांचा वापर करण्याचे आवाहन एक वही एक पेन अभियानचे प्रमुख जेष्ठ पत्रकार राजू झनके यांच्याकडून करण्यात येते या आवाहनाला राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळत आहे जमा झालेले शैक्षणिक साहित्य समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात येते महागडे शिक्षण तसेच दोन वर्षातील कोरोना परिस्थितीमुळे तर या विद्यार्थी आणि पालकांना मोठ्या अग्निदिव्यातून सामोरे जावे लागत असल्याने अशा पालक व विद्यार्थ्यांना मदतीचा हात म्हणून १२ जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सव साजरा करीत असताना त्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करावी तसेच गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घ्यावे असे आवाहन एक वही एक पेन अभियानच्या वतीने करण्यात आले आहे*
येत्या १२ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आउसाहेब माता जिजाऊ यांचा जयंतीदिन आहे ही जयंती महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावार ठिकठिकाणी साजरा होते , माता जिजाऊ यांचा जन्म झालेल्या विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील जिजाऊ सृष्टीवर लाखो लोक माता जिजाऊ यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात या ठिकाणी येणाऱ्या शिवप्रेमींनी हारफुलांऐवजी वह्या पेन पुस्तके व ईतर शैक्षणिक साहित्यांनी माता जिजाऊ यांना आदरांजली वाहावी,तसेच समाजातील होतकरू गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घ्यावे असे आवाहन एक वही एक पेन अभियानच्या वतीने करण्यात आले आहे*
राजू झनके-9372343108