अंड्यांसोबत ‘हे’ पदार्थ खाऊ नका अन्यथा आरोग्याचं होईल मोठं नुकसान

मुंबई – ‘संडे हो या मंडे रोज खाये अंडे’ ही जाहिरात आपण अनेकदा टीव्हीवर पहिली असेल. याच अनुषंगाने रोज अंडे खाण्याचे खूप फायदे आहेत. अशातच अंडं हे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर मानले जाते. अंड्यांमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. शरीरातील ऊर्जेसोबतच अंड्यामुळे रोगप्रतिकारशक्तीही वाढत जाते.
मात्र, फार कमी लोकांना हे माहित असेल की, काही गोष्टी जर अंड्यांसोबत खाल्ल्या तर अॅलर्जीसारख्या समस्या निर्माण होतात. तसेच अनेक आजारांचा धोकाही वाढतो. अशा परिस्थितीत जाणून घेऊयात, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या अंड्यांसोबत खाऊ नयेत.
१.अंड्यांसोबत मासे खाऊ नका – उकडलेले अंडे माशासोबत कधीही खाऊ नये. याचे मिश्रण शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. याच्या सेवनामुळे त्वचेसंवंधीत ऍलर्जीच्या समस्याही उद्भवू शकतात.
२.अंड्यांसोबत साखर खाणे – अंड्यांसोबत साखर खाणे टाळा. अंडी आणि साखरेमध्ये अमिनो अॅसिड असते. याचे एकत्र सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
३.लिंबू आणि अंडी – लिंबू सामान्यतः लोक जेवणात चव वाढवण्यासाठी वापरतात. पण अंड्यांसोबत लिंबूचे सेवन करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे हृदयविकाराचा धोकाही वाढतो.
४.अंडी आणि चीज – अंडी आणि कॉटेज चीज दोन्हीमध्ये प्रथिने जास्त असतात. त्यामुळे या दोन्हींचे एकत्र सेवन करू नका. असे केल्याने तुमची पचनक्रिया बिघडू शकते.
त्यामुळे याेग्य काळजी घ्या आणि सकस आहार खा.