
आजपासून देशभर आरोग्य कर्मचारी तसेच फ्रंट लाइन वर्कर्स यांना बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली आहे. देशभरात सध्या लसीकरण वेगानं सुरु आहे. सर्वांना लसीचे दोन डोस दिले जात आहेत.याच पार्श्वभूमीवर आजपासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर तसंच ६० वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे.याच बूस्टर डोससंबंधीची महत्वाची माहिती जाणून घेवूयात
यांना देण्यात येणार बूस्टर डोस?
आजपासून भारतात कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर आणि विविध आजार असलेल्या ६० वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना लसीचा बुस्टर डोस देण्यात येणार आहे.
बूस्टर डोस घेताना ही काळजी आवश्य घ्या
बुस्टर डोस देताना या आधी जी लस घेतली आहे, त्याच लसीचा बुस्टर डोस देण्यात येणार असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. ज्या लोकांनी कोव्हॅक्सीनची लस घेतली आहे, अशांना कोव्हॅक्सीनचाच बुस्टर डोस देण्यात येईल. तर ज्यांनी कोव्हिशिल्ड लस घेतली आहे, अशांना कोव्हिशिल्डचाच बुस्टर डोस देण्यात येईल. या बूस्टर डोससाठी Cowin वर नव्याने नोंदणी करण्याची कोणतीही आवश्यकता नाही, असेही केंद्राने म्हटले आहे.
या ठिकाणी जावून घ्या लसबूस्टर डोस
बूस्टर डोससाठी पात्र असलेले लोक कोणत्याही लसीकरण केंद्रात जाऊन बूस्टर डोस घेऊ शकतात. हा बूस्टर डोस घेण्यासाठी कोविनवर स्लॉट बुक करणे गरेजेचे नाही. मात्र हे डोस कुठे मिळू शकतील याची माहिती कोविन अॅपवरच मिळू शकणार आहे.
आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर आणि विविध आजार असलेल्या ६० वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना ही लस सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत देण्यात येणार आहे. मात्र खासगी हॉस्पिटल्स आणि खासगी लसीकरण केंद्रांवर यासाठी पैसे मोजावे लागतील.
दोन डोसनंतर किती दिवसांनी बूस्टर डोस घ्यावा?
ज्यांचे दोन डोस घेऊन नऊ महिने म्हणजेच ३९ आठवडे झाले आहेत, त्यांनाच हा तिसरा बूस्टर डोस घेता येणार आहे. संबंधित व्यक्तीचा हा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर, त्यांना कोविनकडून तिसरा डोस घेण्याबाबतचा मेसेजही येणार आहे.