दिलासादायक: मुंबईत कोरोना रूग्ण संख्येत उतार..

मुंबई:- राज्यात कोरोनाचा प्रसार काहीसा मंदावला आहे. अश्यात चार दिवसांपासून राज्यात दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.राज्यात आज ३४ हजार ४२४ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर १८ हजार ९६७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.
राज्यात आज ३४ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. तर आतापर्यंत राज्यात एकुण १२८१ ओमायक्रॉन बाधितांची नोंद झाली आहे. त्यापैकी ४९९ रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत. सध्या राज्यात ओमायक्रॉनचे एकूण ७८२ रुग्ण आहेत.
मुंबईतील कोरोना परिस्थिती-
मुंबई महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार मागील २४ तासांत ११ हजार ६४७ नवे कोरोनाबाधित समोर आले असून दोन जणांचा कोरोनावर उपचार घेताना मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत मंगळवारी तब्बल १४ हजार ९८० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट ९८ टक्क्यांवर कायम राहिला असून मागील २४ तासांत दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या १६ हजार ४१३ झाली आहे.दरम्यान कोरोना रूग्णसंख्येत दिलासादायक घट होताना पाहायला मिळत आहे.