ब्रेकिंग

मुंबईवर भीतीचं सावट,मुंबई आणि महाराष्ट्रात ड्रोन हल्ल्यांबाबतचं संभाषण पोलिसांच्या हाती

मुंबई- दहशदवादी संघटना सातत्यानं मुंबईसंदर्भातील खुरापती करत असतात. अश्यात मुंबई आणि महाराष्ट्रात ड्रोन हल्ल्यांबाबतचं संभाषण चौकशी यंत्रणांच्या हाती लागल्यांनं पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात असं काही घडलं तर आपल्याकडे अँटी-ड्रोन यंत्रणाही नाही. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी ही बाब मान्य केली आहे.

मुंबईला हादरवून टाकणारं डार्क नेटचं कारस्थान पुन्हा एकदा समोर आलं आहे. जम्मू कश्मीर आणि पंजाबमध्ये ड्रोनमुळे असणाऱ्या संभावित भीतीबाबत कायम बोललं जातं. मात्र, आता संरक्षण यंत्रणांनी मुंबई आणि महाराष्ट्रात ड्रोन हल्ल्यांबाबतचं संभाषण पकडलं आहे. यापेक्षा गंभीर बाब म्हणजे, भविष्यात असं काही घडलं तर महाराष्ट्रात अँटीड्रोन सिस्टमही नाही.

त्यामुळे ही गंभीर बाब लक्षात घेवून मुंबई पोलीस दल आपली यंत्रणा आद्यायावत करण्यासाठी प्रयत्न करत आहे.तसंच हल्ला झालाच तर त्यापासून कसा बचाव करता येईल यासाठी देखील प्रयत्न करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!