दिलासादायक :मुंबईत कोरोना रुग्ण संख्येत मोठी घट;राज्यातील रुग्णसंख्येतही उतार.
मुंबई- राज्यात कोरोना रूग्णसंख्येत आज काहीसं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाचे 41,327 रुग्ण आढळले आहेत.तर आज दिवसभरात 29 जणांचा मृत्यू झाला आहे.कालच्या तुलनेत आज रूग्णसंख्या घटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
सकारात्मक बाब म्हणजे राज्यात गेल्या २४ तासात 40,386 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.तसंच राज्यात आज 8 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 1738 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 932 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत. दरम्यान काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
मुंबईतील कोरोना परिस्थिती-
मुंबईतील कोरोना रुग्णाची संख्या घटताना दिसत आहे. मागील काही दिवसांत रुग्णसंख्या सतत काही प्रमाणात कमी होत असल्याने प्रशासनासह नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. मागील २४ तासांत 7895 नवे कोरोनाबाधित सापडले असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे.काल च्या तुलनेत ही संख्या काही प्रमाणात कमी आहे.