‘पुष्पा’ चित्रपटातील केवळ तीन मिनिटांच्या आयटम साँगसाठी समांथाने आकारले कोट्यावधी, मानधनाची रक्कम वाचून व्हाल चकीत

मागच्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री समांथा आपल्या घटस्फोटामुळे चांगलीच चर्चेत आहे. या चर्चा तिच्या खासगी आयुष्यामुळे सुरु झाल्या होत्या. पतीला घटस्फोट दिल्यानंतर तिला अनेकदा ट्रोल करण्यात आले.त्यानंतर द फॅमिली मॅन २ या वेबसिरीजमधील तिची व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली होती.
यानंतर आता ती ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘उ अंतावा, उ उ अंतावा’ या आयटम साँगमुळे प्रचंड चर्चेत आहे. यात तिच्या डान्सचे प्रचंड कौतुक केले जात आहे. दरम्यान या आयटम साँगसाठी तिने कोट्यावधी रुपयांचे मानधन आकारल्याची चर्चा आहे. यानंतर आता त्याचा खरा आकडा समोर आला आहे.
सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा फार चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला असून या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.
‘पुष्पा द राइज’ या चित्रपटात अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत. तर दुसरीकडे समांथाने पहिल्यांदाच आयटम साँग केले आहे. या गाण्यात ती एकदम बोल्ड अंदाजात दिसत आहे. या गाण्यासाठी समांथाने मोठी रक्कम मानधन म्हणून घेतली आहे. समोर आलेल्या माहितीनीनुसार ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘उ अंतावा उ उ अंतावा’ हे गाणे केवळ ३ मिनिटांचे आहे. या आयटम साँगसाठी समांथाने ५ कोटी रुपये मानधन आकारले आहे.