महालासारखी सुंदर आहे अल्लू अर्जूनची व्हॅनिटी व्हॅन; किंमत ऐकून बसेल धक्का

तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुन त्याच्या स्टाईलसाठी लोकप्रिय आहे.सध्या तो त्याच्या पुष्पा चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे.अल्लू अर्जुन ज्याप्रमाणे नवनवीन स्टाईल करत असतो त्याच प्रमाणे तो वेगवेगळ्या स्टाईलच्या गाड्यादेखील घेताना दिसतो.अल्लू अर्जुनकडे बऱ्याच महागड्या गाड्या आहेत.
अनेकदा अल्लू अर्जुन त्याच्या या महागड्या गाड्या घेऊन चित्रपटाच्या चित्रीकरणाला जाताना दिसतो.अल्लू अर्जुनच्या इतर गाड्यांप्रमाणेच त्याची व्हॅनिटी व्हॅन देखील खूप महाग आहे.अल्लू अर्जुनने मध्यंतरी त्याच्या इन्स्टाग्रामवर या व्हॅनिटी व्हॅनसोबतचा फोटो पोस्ट केला होता.ही एक साधीसुधी व्हॅन नसून अल्लू अर्जुनने ती खास स्वत:साठी Reddy Custom द्वारे तयार करवून घेतली आहे.या व्हॅनची किंमत तब्बल ७ कोटी रुपये आहे.तसेच या व्हॅनवर ‘AA’ असा लोगो काढण्यात आला आहे.
ही व्हॅन काळ्या रंगाची असून व्हॅनच्या आत देखील काळ्या रंगाचा वापर करण्यात आला आहे.अल्लू अर्जुनचे व्हॅनसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.अल्लू अर्जूनची ही व्हॅन खूप सुंदर आणि आरामदायी आहे.
त्याच्या व्हॅनमध्ये एक खास मेकअप चेअर देखील ठेवण्यात आली आहे.अल्लू अर्जुनच्या व्हॅनिटीची मुळ किंमत साडेतीन कोटी रुपये आहे. पण या व्हिनिटीला स्टाईलिश बनवण्यासाठी अल्लू अर्जुनने भरपूर खर्च केला आहे. त्यामुळे याची किंमत ७ कोटी रुपयांपर्यंत जाते.