ब्रेकिंग

भाषण देता-देता मध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टेलिप्रॉमटर बंद पडला,अन मोदी गोंधळले,पहा व्हिडिओ

नवी दिल्ली:- पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच आपल्या भाषणाने देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चेत असतात.विविध राज्यात विविध मुद्दे घेऊन ते नेहमीच व्यक्त होताना पाहायला मिळतात.मात्र,काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय मुद्द्यांना घेऊन वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दाव्होस अजेंड्यावर भाषण देत असताना अचानक त्यांचा टेलिप्रॉमटर बंद पडला आणि गोंधळ उडाला.

पंतप्रधान मोदी यावेळी काहीशे अस्वस्थ झाल्याचे पाहायला मिळाले.त्यानंतर ते काही वेळ थांबले.आणि माझा आवाज व्यवस्थित येतोय ना,असं समोरच्यांना विचारू लागले.दरम्यान अवघ्या काही मिनिटात टेलिप्रॉमटर पुन्हा सुरू झाला आणि मोदींनी आपल्या भाषणाने उपस्थितांवर छाप पाडली.मात्र त्यांच्या भाषणापेक्षा सध्या सोशल मीडियावर या भाषणादरम्यान बंद पडलेल्या टेलिप्रॉम्टरचीच चर्चा अधिक होताना पाहायला मिळत आहे.

सध्या सोशल मीडियावर याबाबतचे मिम्सही मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत.सोबतच हा मुद्दा ट्विटरवर ट्रेंड होत आहे.दरम्यान आपला देश कोरोनाशी किती सकारत्मकतेने लढतोय,याचं स्पष्टीकरण या भाषणातून दिलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!