ब्रेकिंग
५० हजार मातीच्या दिव्यांपासून साकारले कलाकार चेतन राऊत यांनी शिवसेनाप्रमुखांचे पोर्ट्रेट

मुंबई:- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कलाकार चेतन राऊत यांनी पवई येथे ५० हजार मातीच्या दिव्यांपासून शिवसेनाप्रमुखांचे पोर्ट्रेट साकारले आहे.पवईच्या आयआयटी मुंबईजवळील माता रमाबाई नगरातील महानगरपालिका शाळेजवळील हरिश्चंद्र मैदानात हे पोर्ट्रेट साकारण्यात आले आहे.
यासाठी सहा रंगछटा असलेले दिवे वापरण्यात आले आहेत. ४० फूट लांब आणि ३० फूट रुंद आकारचे हे पोर्ट्रेट साकारण्यासाठी चेतन आणि त्यांच्या टिमला नऊ तास लागले आहेत.दरम्यान उद्या हे पोट्रेट सर्वांना पाहण्यासाठी खुले असेल.
हरिश्चंद्र मैदान, महानगरपालिका शाळेच्या जवळ ,माता रमाबाई नगर , आई आई टी, पवई, मुंबई येथे हे पोट्रेट २५ जानेवारीपर्यंत सर्वांना पाहता येईल.