महाराष्ट्रावर धुळीच्या वादळाचे सावट,पुढील १२ तास महत्वाचे

मुंबई:- महाराष्ट्रावर सध्या धुळीच्या वादळाचं सावट आहे.पाकिस्तानात निर्माण झालेलं धुळीचं वादळ अरबी समुद्रामार्गे महाराष्ट्राच्या दिशेने आलं आहे.त्यामुळे येत्या १२ तासात मुंबई,ठाणे,पालघर आणि उत्तर कोकणात काही ठिकाणी धुळीचे वारे येण्याची शक्यता आहे.या वाऱ्यांचा वेग ताशी २० ते ३० किमी वेगाने वाहणार आहेत.असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे.याच धुळीच्या वादळाने काल संपूर्ण मुंबई सह राज्यातील काही भागात घरांवर व वाहनांवर सफेद रंगाची पावडर पसरली होती.
23/01; पुढील १२ तासांत उत्तर कोकणात काही ठिकाणी धुळीचे वारे (तास 20-30 किमी) येण्याची शक्यता आहे. मुंबई ठाणे पालघर आणी आसपासच्या भागांत
– IMD
Pl read below,
To distinguish dust layer. Dust appears pink/magenta during day and purple at night. pic.twitter.com/sT4Kb81ARL— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 23, 2022
याच धर्तीवर आज सकाळपासूनच मुंबईतील हवेची पातळी खालावल्याचं चित्र आहे.धुळीच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी दृश्यमानता कमी झाल्याने अंधुकता पाहायला मिळत आहे.तसंच मुंबईतलं धुळीचं प्रमाण वाढल्याने इमारतीही काहीशा अंधुक दिसत आहे.
पुढील १२ तास यासंदर्भात महत्वाचे असून हळूहळू हे वादळं ठाणे आणि उत्तर कोकणाकडे सरकताना पाहायला मिळणार आहे.यानंतर याचा वेग हळूहळू कमी होऊन हे वादळ महाराष्ट्रात लुप्त होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.