मोठी बातमी! १ फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालये सुरू होणार

मुंबई- काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे राज्यातील महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावल्याने राज्यातील शाळांपाठोपाठ महाविद्यालये आणि विद्यापीठे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.राज्यातील महाविद्यालय प्रत्यक्ष १ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.
दरम्यान, महाविद्यालये सुरू करण्याच्या निर्णयाचे शिक्षण क्षेत्रातून स्वागत होत आहे.राज्यातील महाविद्यालय प्रत्यक्ष १ फेब्रुवारी पासुन सुरु होणार आहे. परंतु कोविडची परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचा अधिकार विद्यापीठ आणि स्थानिक प्रशासनाला असेल ज्या विद्यार्थ्यांचे दोन डोस पुर्ण झालेले आहेत त्यांनाच प्रवेश मिळणार आहे.
१५ फेब्रुवारीपर्यंत घेण्यात येणा-या परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्यात तर त्यानंतर परीक्षा ऑफलाईन घ्यायच्या किंवा ऑनलाईन याचा विचार स्थानिक पातळीवर घेण्याचा अधिकार आहे.