‘वर्क फ्रॉम होम’नंतर उद्धव ठाकरे सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी; वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण संपन्न

मुंबई:- आज भारतभर प्रजासत्ताक दिनाचा उत्सव साजरा होताना पाहायला मिळतोय. अशात मुंबईमध्ये देखील प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडत आहे. याच धर्तीवर मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर आज स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक ध्वजारोहण केले. तसंच देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.
यावेळी ध्वजास सलामी देणाऱ्या पोलीस पथकासह, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तब्बल तीन महिन्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहिल्याचे पाहायला मिळाले.
वाढता कोरोना प्रादुर्भाव आणि मानेवर झालेली शस्त्रक्रिया यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या अनेक दिवसांपासून घरातूनच महाराष्ट्रभरातील सर्व कामकाज पाहत होते. दरम्यान आज आपल्या सपत्नीक वर्षा बंगल्यावरील ध्वजारोहणास उपस्थित राहत उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.






