ब्रेकिंग

व्हॉट्सॲप ग्रुप अॅडमिन आहात ? मग जाणून घ्या हे व्हॉट्सॲप चे नविन फिचर

टेक्नॉलॉजीच्या बाबतीत व्हॉट्सॲप आपल्या यूजर्ससाठी नेहमीच काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करत असतं. तुम्हीसुद्धा व्हॉट्सॲप वापरत असाल आणि या इन्स्टंट मेसेजिंग ॲपपवरील ग्रुपचे ऍडमिन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. व्हॉट्सॲप तुमच्यासाठी लवकरच एक नवीन फीचर घेऊन येणार आहे. कंपनी अशा फीचरवर काम करत आहे, ज्याच्या अंतर्गत तुम्ही ग्रुपमधील कोणत्याही सदस्याचा मेसेज तुम्हाला पाहिजे तेव्हा डिलीट करू शकता. या नवीन फीचरचं टेस्टिंग सध्या सुरु आहे. या फीचरचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे ते जाणून घ्या. 

वैशिष्ट्य काय असेल?
रिपोर्टनुसार,मेटाच्या (meta) मालकीची ही कंपनी गेल्या काही दिवसांपासून या फीचरवर काम करत आहे. यावर अनेक टेस्टिंग झाल्या आहेत. हे फीचर लवकरच रिलीज होण्याची शक्यता आहे. या फीचरला मॉडरेशन फीचर म्हणतात. हे टेलिग्रामवरील फीचरसारखेच असणार आहे. हे फीचर लॉन्च झाल्यानंतर, ग्रुप ऍडमिनला त्याच्या ग्रुपमधील कोणत्याही मेंबरचा मेसेज आक्षेपार्ह वाटल्यास तो डिलीट करता येऊ शकतो. या फीचरची अनेक दिवसांपासून ग्रुपकडे मागणी होत होती. आता यूजर्स या नवीन फीचरच्या रिलीजची वाट पाहत आहेत.

कसे काम करेल हे फीचर?
रिपोर्टनुसार, या फीचरशी संबंधित एक स्क्रीनशॉटही व्हायरल झाला आहे. यामध्ये जर ग्रुप ऍडमिन एखादा मेसेज डिलीट करू शकत असेल. तर मेसेज डिलीट केल्यानंतर असे लिहिले होते की, हा मेसेज ऍडमिनद्वारा डिलीट करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!