माजी मुख्य सचिव सिताराम कुंटे यांचे अनिल देशमुखांवर गंभीर आरोप, म्हणाले…

मुंबई- गृह विभागाचे माजी मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी ईडी चौकशी दरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सिताराम कुंटे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असताना अनिल देशमुख पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीची अनधिकृत यादी पाठवत असल्याचा मोठा आरोप कुंटे यांनी केला आहे.
ईडीने मनी लाँड्रिंगप्रकरणी तपास करत असताना मागील वर्षी ७ डिसेंबरला सिताराम कुंटे यांचा जबाब नोंदवला. यात कुंटे यांनी पोलीस विभागाच्या बदलीबाबत ही माहिती दिली आहे.
सिताराम कुंटे यांनी ईडीला दिलेल्या माहितीनुसार,’अनिल देशमुख गृहमंत्री असताना विशिष्ट पोलीस अधिकारी किंवा विशिष्ट पदांवरील बदल्यांची एक अनधिकृत यादी पाठवायचे. ते आपले खासगी सचिव संजीव पालंडे यांच्यामार्फत ही यादी पाठवायचे. ही यादी मला माझ्या कनिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत मिळायची. मी त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या विभागात काम करत असल्याने मी या यादीला नकार देऊ शकत नव्हतो’.