आता घरबसल्या मोबाईलवर करा कोविड चाचणी,जाणून घ्या सविस्तर माहिती
गेल्या दोन वर्षांपासून आपण सर्वजण कोरोनाने त्रस्त झालो आहोत. अशातच अनेकांना कोरोनामुळे आपले उद्योग-धंदे,नोकरी देखील गमवावी लागली आहे. अनेकांची आर्थिक परिस्थिती खालावल्याने त्यांच्यावर चिंतेची वेळ ओढावली आहे.यातच कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर आर्थिक परिस्थिती अभावी अनेकांनी कोरोना टेस्ट करणं देखील टाळल्याचं आपण पाहिलं आहे.
मात्र, आता एक दिलासादायक बाब समोर आली आहे. आपल्याला कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यानंतर आपला कोरोना रिपोर्ट पॉजिटिव्ह आहे की नेगेटिव्ह आहे,हे आता आपल्याला मोबाईलच्या ऍपवर समजणार आहे.कॅलिफोर्निया येथील संशोधकांनी या संबंधित शोध लावला आहे.या संशोधनाच्या मदतीने आपण आपला रिपोर्ट चेक करू शकणार आहोत.
हे ऍप कसे काम करते?
१.या ऍपचा वापर करण्यासाठी सर्वात आधी मोबाईलला वापरकर्त्यांना हॉट प्लेट,रिऍक्टिव्ह सोल्युशन आणि स्मार्ट फोन असणे आवश्यक आहे.
२.यानंतर स्मार्ट फोनमध्ये वापरकर्त्यांना Bacticcount ऍप डाऊनलोड करावे लागेल.
३.हे ऍप संशोधकांकडून मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे.
४.हे ऍप फोनच्या कॅमेऱ्याने टिपलेल्या डेटाचे विश्लेषण करणार आहे.
५.याच विश्लेषणावरून तुमची कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह याची माहिती मिळणार आहे.





