सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयावर समाजसेवक अण्णा हजारेंनी दिली प्रतिक्रिया,म्हणाले…

राळेंगणसिद्धी- महाराष्ट्र सरकारने नुकताच सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाइन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय महाराष्ट्रातील जनतेसाठी अतिशय दुर्दैवी आहे असेच म्हणावे लागेल, असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केलं आहे.
एकीकडे राज्य सरकार हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतल्याचे सांगत आहे. तसेच वाईन म्हणजे दारू नाही असेही सांगण्यात येत आहे. असे निर्णय या राज्याला कुठे घेऊन जाणार हा खरा प्रश्न असल्याची टीका अण्णा हजारेंनी केली आहे.
शेतकऱ्यांचेच हित पहायचे असेल तर गोरगरीब, सामान्य शेतकरी आपल्या शेतात जे पिकवतो त्याला राज्य आणि केंद्र सरकारने हमीभाव द्यायला हवा. पण त्याकडे रितसर दुर्लक्ष करून अशा प्रकारे वाइनची खुली विक्री करून एक वर्षात एक हजार कोटी लिटर वाइन विक्रीचे उद्दीष्ट ठेवणारे सरकार यातून नेमकं काय साध्य करणार आहे?, असा प्रश्न अण्णा हजारेंनी उपस्थित केला आहे.





