ब्रेकिंग
आमदार नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांना न्यायालयाने सुनावली ४ दिवसांची पोलीस कोठडी

सिंधुदुर्ग:- शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आरोप असलेले भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर कणकवली दिवाणी न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे. आज दुपारी ३ वाजता आमदार नितेश राणे यांच्या संदर्भात न्यायालय निकाल सुनावणार आहे.
मात्र, दुसरीकडे आज आमदार नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांना न्यायालयानं ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांना आज सकाळी कणकवली दिवाणी न्यायालयात हजर केले असता त्यांना ४ फेब्रुवारी पर्यंतची न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
दुसरीकडे आज जिल्हा सत्र न्यायालयात आमदार नितेश राणे न्यायालयाला शरण गेल्यानंतर त्यांच्या नियमित जामीनावर दुपारी ३ वाजता निर्णय येणार आहे.या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.या निर्णयानंतर नितेश राणेंना अटक होणार की जामीन मिळणार हे ठरणार आहे.