ब्रेकिंग
पत्नीनेच दिली पतीच्या हत्येची सुपारी,एक लाख रुपये देऊन घडवून आणला हत्येचा कट

नाशिक- नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.पत्नीनेच पतीची हत्या करण्यासाठी एक लाख रुपयांची सुपारी देऊन त्याला यमसदनी धाडल्याचे नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हेशाखेच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणात पत्नीसह बांधकाम व्यावसायिक, इडली- डाेसा विकणाऱ्या अण्णासह सात जणांना अटक करण्यात आली आहे.सचिन श्यामराव दुसाने असे मृत पतीचे नाव आहे. त्याचा मृतदेह काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये पेठ येथे आढळला हाेता.याचा पोलीस तपास करत असताना पत्नीनेच पतीच्या हत्येची सुपारी दिल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं.
या प्रकरणी पत्नीसह बांधकाम व्यावसायिक, इडली- डाेसा विकणाऱ्या अण्णासह सात जणांना अटक करण्यात आली असून या प्रकरणात खुनाच्या सुपारीची एक लाखांची रक्कम, माेबाईल व एक कार असा लाखाेंचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.