उधारीच्या अवघ्या १०० रुपयांसाठी मित्रानेच केली मित्राची हत्या,दहिसरमधला प्रकार

मुंबई:- मुंबईतील दहिसर परिसरामध्ये मित्राने शंभर रुपये घेतले आणि ते परत देत नसल्यामुळे झालेल्या वादात मित्राची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यानंतर हत्या करणाऱ्याच परमेश्वर कोकाटे याने पोलीस नियंत्रण कक्षाला मित्राच्या मृतदेहाची माहिती दिली.मात्र,ही माहिती देताना त्याने एक व्यक्ती जळलेल्या अवस्थेत पडला आहे,अशी माहिती दिली.यानंतर लगेचच पोलीसांनी घटनास्थळी जाऊन संबंधित जळालेल्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेले. त्यावेळी डॉक्टरांकडून त्याला मृत घोषित करण्यात आले होते.
दरम्यान पोलिसांना हा अपघात नसून हत्या असल्याचे लक्षात आले. नंतर पोलिसांनी चौकशी केली असता पोलीस नियंत्रण कक्षामध्ये फोन करणारा मित्र परमेश्वर कोकाटे यानेच राजू पाटील याची हत्या केली व पुरावे नष्ट करण्यासाठी जळल्याचा बनाव रचल्याचं समोर आलं
पोलिसांनी आता त्याला अटक केली असून न्यायालयाने त्याला नऊ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबतीची माहिती पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी माध्यमांना दिली आहे.