नवी दिल्ली
काँग्रेस टुकडे टुकडे गँगची लीडर बनली आहे,मोदींचा विरोधकांवर घणाघात

नवी दिल्ली:- सध्या नवी दिल्लीत केंद्रीय अर्थसंकल्पीय संसद अधिवेशन सुरू आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणावर सत्ताधारी आणि विरोधकांमधील विविध खासदारांची भाषणे पूर्ण झाली आहेत.
अश्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांचा समाचार घेतला. तसेच सरकारच्या धोरणांबाबत भूमिका स्पष्ट केली.
दरम्यान विरोधकांवर टीकास्त्र डागत,’काँग्रेस कायमच द्वेष करत आली आहे. विभाजनवादी मानसिकता काँग्रेसच्या DNA मध्ये घुसली आहे. इंग्रज निघून गेले, ‘तोडा आणि राज्य करा’ या नीतीला काँग्रेसने आपले चरित्र बनवले आहे. काँग्रेस तुकडे तुकडे गँगची लीडर बनली आहे’,अशी टिका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर केली आहे.