ब्रेकिंग
मुंबईसह राज्यातली कोरोना रूग्णसंख्या जवळ-जवळ आटोक्यात,वाचा आजची रुग्णसंख्या

मुंबई :- कालच्या तुलनेत आज कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासात राज्यात कोरोनाच्या ६ हजार १०७ नव्या रुग्णांची भर पडली असून ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या २४ तासात १६ हजार ०३५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
तर दुसरीकडे राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली नाही.आतापर्यंत ३३३४ ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी १७०१ रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
मुंबईतील कोरोना परिस्थिती:-
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मुंबईत ४४७ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ७९८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट ९८ टक्के इतका झाला आहे.