गोव्यात शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार सुनिल प्रभु यांच्यासह दिग्गज मंडळी मैदानात

गोवा- गोवा निवडणूकीचं वातावरण चांगलंच तापू लागलं आहे.प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहे.अश्यात शिवसेनेनेही गोव्यात आपला जोर दाखवायला सुरूवात केली आहे.
आज पेडणे विधानसभा मतदार संघाचे शिवसेना उमेदवार श्री सुभाष केरकर यांच्या प्रचारार्थ आयोजित रोड-शो मध्ये मुख्य प्रतोद, आमदार, माजी महापौर श्री सुनिल प्रभु यांनी सहभागी होऊन पेडणे मतदार संघातील कोरेगाव परिसरातील स्थानिक प्रतिष्ठित नागरिकांच्या भेटी घेऊन, स्थानिक, हक्काच्या, उच्च शिक्षित उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले.
यावेळी मुंबई शहराच्या महापौर किशोरी पेडणेकर, युवासेना सचिव वरूण सरदेसाई, आमदार सुनिल शिंदे, मुंबईचे नगरसेवक बाळा नर, अमेय घोले, समाधान सरवणकर, संदेश पारकर, युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभु, युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, राजापूर उप तालुका प्रमुख तात्या सरवणकर, सर्वेश गुरव आदी उपस्थित होते.