राणे पिता-पुत्रांना येत्या १० तारखेपर्यंत अटक न करण्याचे कोर्टाचे आदेश
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणे यांना आता थोडासा दिलासा मिळाला आहे. कारण, दिशा सालीयान आत्महत्या प्रकरणी नारायण राणे आणि नितेश राणे विरोधात मालवणी पोलीस स्थानकात FIR दाखल करण्यात आली होती.याप्रकरणी त्यांना चौकशीला हजर राहण्यासाठी नोटीस देखील पोलिसांनी पाठवली आहे. मात्र, आता दिंडोशी कोर्टाकडून त्यांना अंतरिम दिलासा मिळाला आहे. या पिता-पुत्रांना येत्या १० तारखेपर्यंत अटक न करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.





