सुप्रसिद्ध गायक मिलिंद इंगळे व संगीतकार गिरीश छत्रे यांच्या खलिश-द पेन’ या हिंदी गझलला रसिकांनी दिली मोठी दाद!
दर्दभऱ्या आवाजाने संगीत रसिकांच्या मनाची छेडली तार

मुंबई:आयुष्यातील निराशेनंतर, तिला न जुमानता पुन्हा एकदा आशेचा किरण तेवत ठेवणारा अशा एका व्यक्तिरेखेला शब्दात चितारलं आहे सुप्रसिद्ध शायर डॉ. संदीप गुप्ते यांनी.. आणि त्या शब्दांना आपल्या खास शैलीत, सहज सोप्या चालीत मूर्त स्वरूप देण्याचं काम केलं आहे, प्रसिद्ध संगीतकार गिरीश छत्रे यानी आणि तेही पटकन मनाला भिडून गुणगुणू लागावी अशी चाल लावून..
ही त्यांची खासियत कित्येक रसिकांनी बोलून दाखवली. या त्यांच्या कलाकृतीवर आपल्या तरल आणि भावनाप्रधान आवाजाने स्वरसाज चढवला आहे गारवा फेम सुप्रसिद्ध गायक मिलींद इंगळे यांनी तर या भावनेला तितक्याच ताकदीने चित्रीत करून सादर केले आहे अजय गोखले आणि सहकारी यांनी.
चित्रपट मेमरी कार्ड आणि सध्या स्टार प्रवाह वरील स्वाभिमान मालिकेतील अभिनेत्री अपूर्वा परांजपे आणि तितकाच ताकदीचा तरूण कलाकार उदित पाटील यांनी ही ध्वनिचित्रफीत प्रेक्षणीय केली आहे.
लोकानी दिलेली दाद आणि भरभरून देत असलेला प्रतिसाद तेवढ्याच जोमाने ही कलाकृती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवत आहे. यातील काही प्रतिक्रिया “गझल ऐकून चालीतून जगजितसिंह यांची आठवण येते “, ही सगळ्यात मोठी पोचपावती.
व्हॅलेंटाइन दिवसाच्या निमित्ताने गिरीश छत्रे यांची आणखीन एक गझल जी वैशाली सामंत यांना चाल आवडली आणि त्यानी गायली, ती लोकांपर्यंत पोचली आणि ती देखील उत्तम चालीसाठी वाखाणली गेली. एका महिन्यात दोन यशस्वी गझल श्रोत्यांसमोर आणून गिरीश छत्रे यानी नक्कीच आपल एक वेगळ स्थान निर्माण केल आहे यात शंकाच नाही.
तेव्हा लगेचच swarada music या यूट्युब चॅनलला भेट द्या..
खलिश-द पेन ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा…