
मुंबई:विकास पाठक उर्फ हिंदुस्तानी भाऊला मुंबई उच्च न्यायालयानं तूर्तास दिलासा दिला आहे. मुंबई पोलिसांच्या विनंतीवरून विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी विकास पाठक विरोधात सुरू केलेल्या ‘प्रतिबंधात्मक कारवाई’ अंतर्गत तूर्तास कोणतेही आदेश न देण्याचे निर्देश हायकोर्टानं जारी केले आहेत.
मात्र 16-17 वर्षांच्या विद्यार्थ्यांची माथी आंदोलनासाठी का भडकवली?, असा सवाल उपस्थित करत विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊला हायकोर्टानं खडे बोल सुनावले आहेत.
16-17 वर्षांची ही मुलं भाबडी असतात. सोशल मीडियाच्या या युगात ते चटकन एखाद्यावर प्रभावित होतात. दिल्ली, आझाद मैदान इथं काही वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांवरून योग्य तो बोध घ्यायला हवा.
सोशल मीडियावर प्रभुत्व असलेल्या सेलिब्रिटिंनी थोडं जबाबदारीनं वागायला हवं. आपल्या बोलण्याचा काय परिणाम होईल याचा गंभीरतेने विचार करायला हवा. अशाा शब्दांत हायकोर्टानं हिंदुस्तानी भाऊचे कान उपटले आहेत.