ब्रेकिंगकोंकणमहाराष्ट्रमुंबई
सावधान ! मुंबई-ठाणे परिसरासह कोकणात येतेय उष्णतेची तीव्र लाट..

मुंबई: देशाच्या वायव्येकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे राज्यात गेल्या २-३ दिवसांपासून उन्हाचे चांगलेच चटके बसू लागले आहेत. मुंबई-ठाणे परिसरासह कोकणात उष्णतेची तीव्र लाट पसरत असल्याचे वृत्त आहे.
मुंबईचे तापमान सोमवारी ४० अंशांच्या जवळपास पोहोचले, तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील कमाल तापमान चाळिशीच्या आसपास गेले आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे सहीत संपूर्ण कोकणात अंगाची लाहीलाही करणारे ऊन आणि प्रचंड उकाडा निर्माण झाला आहे. विदर्भातही तापमानात झपाटय़ाने वाढत आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातही दिवसाचे तापमान सरासरीच्या तुलनेत वाढले आहे. तापमानातील ही वाढ संपूर्ण राज्यात पुढील तीन ते चार दिवस राहील असा अंदाज आहे.
तीव्र उन्हामुळे ऊष्माघात होउन प्राणावर बेतले जाऊ शकते म्हणूनच उन्हापासून बचाव करावा, जास्त उन्हात जाणे टाळावे व आपली काळजी घ्यावी…





