नवी दिल्लीवाहतूक
केंद्र सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांना बसणार मोठा फटका

नवी दिल्ली: भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना गेल्या कित्येक वर्षांपासून रेल्वे तिकीटावर सूट देण्यात येत होती. मात्र कोरोना काळात तिकीटावर देण्यात येणारी सूट बंद करण्यात आली.
भारतात आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. कोरोना रुग्ण झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात सूट देण्यात येईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र ही अपेक्षा फोल ठरली आहे.

तिकीटावर सध्या तरी कोणतीही सूट देण्यात येणार नसल्याचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत बोलताना सांगितले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठा फटका बसणार आहे. आता त्यांना प्रवासासाठी पूर्ण भाडे भरावे लागणार आहे. यामुळे रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होईल.





