ब्रेकिंगकोंकणमहाराष्ट्र

म्हणायचे ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ घेते, पवार सरकार”-खासदार गजानन कीर्तिकर यांच्या वक्तव्यामुळे आघाडीतील मतभेद उघड

मुंबई: शिवसेना नेते  माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते  यांच्यानंतर शिवसेनेचे नेते व खासदार  गजानन किर्तीकर  यांनीही आता महाविकास आघाडी कारभाराबाबत नाराजी व्यक्त केल्याने या आघाडीत सर्वच आलबेल नाही, असे दिसून येत आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली  तालुक्यात रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करताना ते बोलत होते.
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तीकरांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील धुसफूस समोर आली आहे. कीर्तीकरांच्या टीकेमुळे महाविकास आघाडीला सरकारला घरचा आहेर मिळाला आहे. रत्नागिरीत एका कार्यक्रमात बोलताना शिवसेनेला पुरेशा प्रमाणात निधी मिळत नसून शिवसेनेवर अन्याय होतोय अशी नाराजी त्यांनी बोलून दाखवली.आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ कोण घेते, पवार सरकार” असे, म्हणत गजानन किर्तीकर यांनी महाविकास आघाडीला सरकारला घरचा आहेर दिला. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील शिर्दे येथे ब्राह्मणवाडी ते कोळबांद्रे रस्त्याच्या डांबरीकरण कामाच्या भूमिपूजन करण्यात आलं. या समारंभात किर्तीकर बोलत होते.
“एका आमदाराला त्याच्या मतदार संघात विकासकामासाठी शासनाकडून निधी मिळविण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागते, विकासकामांच्या निधीमध्ये पळवापळव केली जात असून ग्रामविकास मंत्रालयाच्या २५ /१५ योजनेमधून निधी मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळते. आम्हाला मुंबईमध्ये हा प्रश्न उद्भवत नाही, मुंबईमध्ये नागरोत्थान, नगरविकासचा निधी मिळतो, मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून आम्ही निधी मिळवतो, मात्र निधीची पळवापळवी केली जात असून ” आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ कोण घेतो, पवार सरकार” असे म्हणत त्यांनी निधी वाटपात शिवसेनेवर अन्याय होत असल्याने नाराजी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!