ब्रेकिंग
“ए आधी एसटी सुरू कर, मग भाषण दे” दापोलीत परिवहन मंत्री अनिल परबांना एका कार्यकर्त्याने सुनावले

दापोली : येथील शिवपुतळा अनावरणावेळी परिवहन मंत्री अनिल परब यांचे भाषण सुरू असताना एका कार्यकर्त्याने
गोंधळ घातला. ना. अनिल परब यांना एकेरी भाषेत संबोधून ” ए आधी एसटी सुरू कर, मग भाषण दे” असे मोठ्याने सुनावले.
यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी या कार्यकर्त्याला शांत राहण्यास सांगितले. मात्र पोलिस अधीक्षकांनाही त्याने दाद दिली नाही. सर्व सोहळा संपल्यावर दापोली पोलिसांनी या कार्यकर्त्यास ताब्यात घेतले. मात्र यात राजकीय मध्यस्ती होताच त्याच्याकडून लिहून घेत त्याला सोडून देण्यात आले.