असनी चक्रीवादळ:कोकणात मुसळधार पावसाची शक्यता..

सिंधुदुर्ग :बंगालच्या उपसागरात तयार झालेला ‘असानी’ चक्रीवादळाचा प्रभाव देशातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये दिसून येत आहे, आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि लगतच्या राज्यांमध्ये पहायला मिळला, तसेच जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि वादळामुळे अनेक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली.
दरम्यान काल सिंधुदुर्ग जिल्हयात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. कुडाळ मध्ये देखील पावसाने विजप्रवाह खंडीत झाला होता, मात्र एमएसईबी कर्मचारी व अधिकारी यानी अथक प्रयत्न क़रुन वीज पुरवठा सुरळीत केला.
महाराष्ट्रात आज देखील वादळी वारे आणि विजांसह काही ठिकाणी मध्यम पाऊस, तसेच तुरळक ठिकाणी मुसळधार सरी पडण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येत आहे. येत्या काही तासांमध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, नांदेड, चंद्रपूर या जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.