महाराष्ट्रकोंकणमुंबई

महाराष्ट्र भूषण सोहोळ्यात घडलेली घटना दुर्दैवीच आहे. भर ऊन्हात घेण्याचा निर्णय आयोजकांशी चर्चा करूनच-उदय सामंत

तपमान वाढल्याने घडली दुर्घटना

मुंबई,17 (प्रतिनिधी) नवी मुंबईतील खारघरमध्ये रविवारी (16 एप्रिल) महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते.ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना या कार्यक्रमात महाराष्ट्र भूषण पुरस्कार देवून गौरवण्यात आले. यावेळी उष्माघाताचा फटका बसून १३ श्री सेवक मृत्यूमुखी पडले असून १८ जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत.

प्रशासनाने या सोहळ्यासाठी संपूर्ण तयारी केली होती. परंतु तपमान वाढल्याने ही दुर्देवी घटना घडली, अशा प्रसंगी राजकारण करणे अयोग्य असल्याचे सामंत म्हणाले. या कार्यक्रमासाठी 600 मदतनीस होते. 150 नर्स होत्या. 73 रुग्णवाहिका होत्या. त्यातील 94 साध्या आणि 19 कार्डिअॅक होत्या. अमरायीमध्ये 4 हजार बेड्सचं हॉस्पिटल तयार केलेलं होतं. एमआयजी, कामोठे, आपोलो, टाटा हॉस्पिटल या ठिकाणी देखील बेड राखीव ठेवण्यात आले होते. वैद्यकीय बूथ ठेवण्यात आले होते. तिथे अधिकारी आणि डॉक्टर नेमले होते. रेल्वे स्टेशनवरुन यायला आणि जायला जवळपास 1050 बसेसची व्यवस्था ठेवली होती. बीएमसी, टीएमसी, नवी मुंबई महापालिका, पननेल महापालिका, मीरा भाईंदर महापालिका होत्या. पार्किंगसाठी 21 ठिकाणी व्यवस्था केलेली होती..“प्रशासनाकडून श्रीसेवकांना जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण त्या दोन दिवसात वातावरण बदललं, तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. त्याचा फटका श्रीसेवकांना बसला.

वैद्यकीय सुविधांमध्ये ब्लड बँकपासून प्राथमिक उपचारांसाठी लागणारी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती”, असं उदय सामंत यांनी सांगितलं.

“कालचा प्रकार दुर्देवी आहे. श्रीसदस्य ज्या संख्येने जमले होते त्यांना पाण्यापासून वैद्यकीय सेवा देण्याचा निर्णय श्रीसदस्यांबरोबरच घेण्यात आला होता. पण दुर्देवाने जी घटना घडली ती उष्माघातामुळे घडली आहे. कार्यक्रम एवढा मोठा होता की, 20 ते 22 लाख श्रीसदस्य या कार्यक्रमात सामील झाले होते. प्रशासनाने कुठेही हुकूमशाही वकरुन राबवलेला नव्हता. तर श्रीसदस्यांसोबत चर्चा करुन हा कार्यक्रम केला होता. पण दुर्देवाने यामध्ये सुद्धा राजकारण करणारे राजकारणी महाराष्ट्रात आहे हे आमचं सगळ्यांचं दुर्देवं आहे. या दुर्घटनेचं समर्थन कुणी करु शकत नाही”, असं सामंत म्हणाले.

सरकारवर टीका करण्यात काही लोकं मग्न आहेत. मला त्यांना विनंती वजा सूचना करायची आहे की, ठीक आहे, बाकीच्या वेळी रोज सकाळी साडेनऊ वाजता खोके, गद्दार, असं ऐकतो. पण जो कार्यक्रम महाराष्ट्र सरकारने शुद्ध आणि पारदर्शकपणाने आयोजित केला होता, आप्पासाहेबांसारखे सामाजिक क्षेत्रात अतुलनीय काम करणाऱ्या माणसाला हा पुरस्कार देण्यात आला. त्यांना बघण्यासाठी लाखो लोक आली. त्यांच्यासोबत अशा पद्धतीची सरकारच्या बाहेर राहून भूमिका घेणं मला योग्य वाटत नाही. अशा प्रसंगामध्ये सगळ्या पक्षांनी एकत्र यायला…

अशा प्रसंगामध्ये सगळ्या पक्षांनी एकत्र यायला पाहिजे. पण कुठल्याही प्रंसगाचं राजकीय भांडवल करायचं, कुठलाही प्रसंग घडल्यानंतर सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची बदनामी करायची, यातून बाहेर येऊन मोठ्या मनाने सगळ्या कालच्या कार्यक्रमाचा विचार करणे गरजेचं आहे. एक कलमी टीका करणं यापेक्षा या बद्दलची अजून काही सूचना असतील तर त्या सूचना सरकारला देण्यात काही प्रोब्लेम नाही.

या नियोजनाचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चार वेळा घेतला होता. कार्यक्रमाच्या आधीच्या दिवशी ते पहाटे तीन वाजेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: मैदानात होते. पालकमंत्री या नात्याने मी स्वत: पाच दिवस तिथे उपस्थित होतो. मी सकाळ-संध्याकाळ आढावा बैठक घ्यायचो. शंभूराज देसाई, रवींद्र चव्हाण यांनी एक आढावा बैठक घेतली. तसेच मुख्य सचिवांनी एक आढावा बैठक घेतली होती. पण कालची घटना ही दुर्देवी आहे”, असं सामंत म्हणाले.

“मृतकांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र सरकार 5 लाखांची मदत करणार आहे. जखमींचा खर्च महाराष्ट्र सरकार करणार आहे. फक्त एकच विनंती या कार्यक्रमाचं राजकीय भांडवल कुणी करु नये. अशा दुर्घटनेच्या आडून राजकीय वातावरण निर्माण करु नका. तर महाराष्ट्राची संस्कृती जपून एकत्र येऊन काम करुयात”, असं आवाहन त्यांनी विरोधकांना केलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!