कुरार मधील ज्येष्ठ नागरिकांना आमदार सुनिल प्रभु यांच्या हस्ते ओळखपत्र वाटप

मुंबई दि.27 (महेश पावसकर) ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा महत्त्वपूर्ण घटक आहे. ज्येष्ठ नागरिकांचे राहणीमान सुसह्य व्हावे, त्यांना आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी व ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार यांची जाणीव व्हावी म्हणून सरकारने हा अधिनियम केला. हा अधिनियम महाराष्ट्रात १ मार्च २००९ पासून लागू करण्यात आला आहे. याचा फायदा मिळावा म्हणून दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांना आमदार मुख्य प्रतोद, माजी महापौर मुंबई सुनील प्रभू यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र काल सहज घरबसल्या करून देण्यात आले
ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी सरकारने विविध योजना सुरू केल्या. त्याचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र आवश्यक असते. या प्रमाणपत्रासाठी अनेक नागरिकांना सतत सरकारी कार्यालयांत हेलपाटे मारावे लागतात. यातून वेळ तर जातोच शिवाय पैसेही खर्च होतात. मात्र, दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांना आमदार मुख्य प्रतोद, माजी महापौर मुंबई सुनील प्रभू यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र घरबसल्या उपलब्ध करून देण्यात आले.
ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र दिल्यानंतर त्यांना बस प्रवास भाड्यात (राज्य परिवहन महामंडळ) ५० टक्के सवलत मिळते. शिवाय रेल्वे, बँक इत्यादी ठिकाणीही त्यांना सुविधा मिळतात. राणी सईबाई शाळेच्या पटांगणात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांना सदरहू ओळखपत्र वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन उपविभाग प्रमुख प्रदीप निकम यांनी केले.
याप्रसंगी आमदार सुनील प्रभू यांच्या समवेत विधानसभा संघटक विष्णू सावंत, उपविभाग प्रमुख प्रदीप निकम, शाखाप्रमुख विजय गावडे, रमेश कळंबे, उप शाखा प्रमुख राजू सावरकर यांच्या सह ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.